Thane Breaking : रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला, व्हिडीओ व्हायरल

Thane Breaking : रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 13, 2025 | 4:12 PM

Thane Breaking News : ठाण्यात एका रिक्षाचालकाने थेट महिला प्रवाश्याच्या अंगावर हात उचलला असल्याची संतप्त घटना घडली आहे.

ठाण्यात महिला प्रवासी आणि रिक्षा चालकात बाचाबाची झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोधल मिडियावर व्हायरल झाला आहे. रिक्षा चालकाने महिला प्रवाशावर हात उचलला आहे. त्यानंतर वाहतूक विभागाने रिक्षाचालकावर कारवाई केली आहे. रिक्षा चालकाचा हा प्रताप सोशल मिडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबईत रिक्षा चलकांची मुजोरी सध्या वाढलेली बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांनी रिक्षा चालक हे प्रवाशांशी दादागिरी करताना दिसत आहेत. नुकताच वसई विरारमधल्या एका रिक्षा चालकाचा व्हिडीओ समोर आला होता. मराठी भाषेच्या वादावरून या रिक्षाचालकाने अपशब्द वापरत मुजोरी केली होती. त्यानंतर आता ठाण्यात एका महिला प्रवासीला चक्क रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने स्वत: हा व्हिडीओ बनवला असून यात रिक्षा चालकाची मग्रुरी बघायला मिळत आहे.

Published on: Jul 13, 2025 04:12 PM