त्यामुळे ओबीसींना काहीही फटका बसणार नाही; बबनराव तायवाडेंचा मोठा दावा

त्यामुळे ओबीसींना काहीही फटका बसणार नाही; बबनराव तायवाडेंचा मोठा दावा

| Updated on: Oct 16, 2025 | 12:57 PM

बबनराव तायवाडे यांनी 2 सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. मराठवाड्यात 35 दिवसांत प्राप्त 73 अर्जांपैकी फक्त 27 अर्ज मान्य झाल्याचे त्यांनी सरकारी पुराव्यानिशी स्पष्ट केले. या जीआरमुळे ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होत नसल्याचा त्यांचा दावा आहे.

नागपूर. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे (जीआर) ओबीसी आरक्षणाला कोणताही फटका बसणार नसल्याचे पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे. या जीआरमुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल, असा दावा इतर काही नेत्यांकडून केला जात असताना, तायवाडे यांनी पहिल्या दिवसापासून आपली भूमिका कायम ठेवली आहे.

तायवाडे यांनी आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ मराठवाड्यातील अधिकृत आकडेवारी सादर केली. 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या 35 दिवसांच्या कालावधीत मराठवाड्यात एकूण 73 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी केवळ 27 अर्ज मान्य करून प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत, तर 46 अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, ही माहिती विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमधून प्राप्त झालेला सरकारी पुरावा आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये एकही अर्ज आलेला नाही. जालना (23), परभणी (11), हिंगोली (5), बीड (11), लातूर (10), आणि धाराशिव (13) या जिल्ह्यांमध्ये अर्ज प्राप्त झाले होते.

Published on: Oct 16, 2025 12:57 PM