Bachchu Kadu : काय दुर्दैव शेतकऱ्यांचं… कृषीमंत्रीच खेळतायत रमी… कोकाटेंच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले
राज्यात शेतकरी आत्महत्येचा विषय चिंतेचा झालेला असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. रोहित पवार यांच्याकडून कोकाटेंचा एक व्हिडीओ ट्वीट करून खळबळ उडवून देण्यात आलीये. त्यावर बच्चू कडू कय म्हणाले?
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या मोबाईलवर रमीचा डाव खेळताना दिसताय. यासंदर्भातील व्हिडीओ रोहित पवारांनी ट्वीट करून खळबळ उडवून दिली. यावर प्रहार संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं.. कृषीमंत्रीच रमी खेळताना मीटींग करतंय. विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या संबंधित समिती गठीत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी कोणत्या उपाययोजना करू, याच्यासाठी समिती गठीत केली मात्र कृषीमंत्र्यांकडून आठवी नववी चूक असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल करत बच्चू कडूंनी माणिकराव कोकाटे यांच्यावर संताप व्यक्त केला. पुढे ते असेही म्हणाले की, एकीकडे म्हणायचं तुम्ही दारी पिताय, लग्नात खर्च होतोय म्हणून तुमच्यावर कर्ज होतंय पण आमचा कृषीमंत्रीच रमीत गुंग असेल तर शेतकऱ्याचं काय भलं होईल. कोल्हापूरमध्ये असताना बच्चू कडू यांनी कृषीमंत्री कोकाटेंच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन भाष्य केलंय.
