Bacchu Kadu Protest : बच्चू कडूंच्या अन्नत्यागाचा चौथा दिवस, कार्यकर्ते आक्रमक अन् उतरले रस्त्यावर, मागण्या काय?
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांचं वजन 2 किलोंनी घटलंय. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी हे उपोषण सुरू केलंय.
राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. सलग चार दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याने बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. पोटात अन्नाचा एकही कण नसल्याने आणि अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंचे वजन तीन किलोंनी घटल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आहेत, काही झोपलेले असून त्यांच्याकडून रस्ता अडवण्याचा प्रयत्न होत आहे. बघा नेमक्या मागण्या काय?
Published on: Jun 11, 2025 02:53 PM
