…म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधान परिषेदत उमेदवार देण्यातून माघार, हर्षवर्धन सपकाळांनी सांगतलं मोठं कारण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना बुधवारी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं, अखेर आता काँग्रेसची भूमिका समोर आली आहे.

सध्या राज्याभरात विधान परिषद निवडणुकीचे वारं वाहत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना बुधवारी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेसदेखील उमेदवार देईल असं सांगितलं जात होतं. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत हे स्पष्ट केलं आहे.
सपकाळ म्हणाले, “भाजपशी आमचा देशपातळीवर संघर्ष आहे, त्यामुळे शिवसेनेला आम्ही इथे पाठिंबा देत आहोत, आगामी निवडणुकींमध्ये आम्ही प्रभावी नेतृत्त्व करू, त्यामुळे आता आम्ही अंबादास दानवेंना पाठिंबा देण्यावर ठाम आहोत.”
पुढे, ‘आमची काही महाआघाडीत बिघाडी असं काहीच नाहीये किंवा माघार वगैरे असं नाही, असंही उपस्थितांनी सांगितलं.