शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा; उद्या समारोप

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडूंची पायदळ यात्रा; उद्या समारोप

| Updated on: Jul 13, 2025 | 11:05 AM

बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेचा आज सातवा दिवस आहे.

बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेचा आज सातवा दिवस आहे. शतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक झालेले असून त्यासाठी त्यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे. उद्या यवतमाळच्या अंबुडा या गावात या पदयात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या वेळी बच्चू कडू यांची जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव, आमदार रोहित पाटील हे दकेहिल उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आत्तापर्यंत बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेचा 101 किलोमीटरचा टप्पा आत्तापर्यंत पूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी त्यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे. यात्रा सध्या महागाव तालुक्यात आहे. या यात्रेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. या पदयात्रेत रूमण हातात घेऊन स्वत: बच्चू कडू शेतकऱ्यांसोबत चालताना दिसून येत आहे. त्यामुळे आता सभेत बच्चू कडू काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Jul 13, 2025 10:42 AM