Bachchu Kadu : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार, 28 तारखेला ट्रॅक्टर, बैलगाड्या अन् जनावरांसह नागपुरात धडकणार

Bachchu Kadu : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार, 28 तारखेला ट्रॅक्टर, बैलगाड्या अन् जनावरांसह नागपुरात धडकणार

| Updated on: Oct 26, 2025 | 8:54 PM

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यात शेकडो ट्रॅक्टर, बैलगाड्या व जनावरांसह शेतकरी सहभागी होणार आहेत. याच दिवशी सरकारकडून बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. या बैठकीतील निर्णयावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला आहे. या संदर्भात 28 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यात केवळ शेतकरीच नव्हे, तर शेकडो ट्रॅक्टर, बैलगाड्या, मेंढ्या आणि इतर जनावरांसह हजारो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. या मोर्च्यापूर्वीच, बच्चू कडूंना सरकारकडून बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी मोर्चा काढला जाणार आहे, त्याच 28 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. बावनकुळे यांनीही बच्चू कडूंना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. सरकारकडून या बैठकीत आंदोलनाबद्दल विचार करण्याची विनंती केली जात आहे. या बैठकीत शेतकरी कर्जमाफीसह बच्चू कडूंच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे.

 

Published on: Oct 26, 2025 08:54 PM