Wine विक्रीच्या विरोधात बोलताना Banda Tatya Karadkar यांचं महिला नेत्यांवर आक्षेपार्ह विधान

Wine विक्रीच्या विरोधात बोलताना Banda Tatya Karadkar यांचं महिला नेत्यांवर आक्षेपार्ह विधान

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 7:59 PM

राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं.

भंडारा : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले.