वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकर यांचं नाव देणार? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: May 15, 2023 | 10:48 AM

VIDEO | वीर सावरकर यांचं नाव देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, काय केली मागणी?

Follow us on

मुंबई : कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच काल मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची ही घोषणा केली.  तर ज्या ठिकाणी जो कोस्टल रोड होणार आहे त्या रोडला आता छत्रपती संभाजी महाराज हे नाव देणार आहोत. याच कोस्टल हायवेच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार असा पुतळा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यानंतर आता वांद्रे-वर्सोवा सीलिंकला (Versova Bandra Sea Link) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात एक पत्र लिहिल्याचे समोर येत आहे. तर यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्याची मागणीही केली जात आहे.