Pankaja Munde | जिल्ह्यातील लक्ष्मी हरवली म्हणून बीडला वाईट दिवस : पंकजा मुंडे

| Updated on: Jan 25, 2022 | 5:01 PM

आपल्या जिल्ह्यातली लक्ष्मी हरवलीय, त्यामुळे हे वाईट दिवस आले आहेत. मी पालकमंत्री असते तर जिल्ह्याचा विकास केला असता. त्यात कोणताही भेदभाव केला नसता, असा थेट निशाणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर साधला.

Follow us on

आपल्या जिल्ह्यातली लक्ष्मी हरवलीय, त्यामुळे हे वाईट दिवस आले आहेत. मी पालकमंत्री असते तर जिल्ह्याचा विकास केला असता. त्यात कोणताही भेदभाव केला नसता, असा थेट निशाणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर साधला. बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायत इमारतीचा आज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर तोंडसुख घेतले. पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर निशाणा साधला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या, मीडियाला विनंती आहे, एकदा लोकांमध्ये जाऊन विचारा. मी जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा खूप काही केले. माझ्या वडिलांचे ऋण उतरवण्याचे काम केले. मात्र मागच्या पाच वर्षात स्थिती उलट झाली. हा जनतेसाठी मोठा धडा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.