Beed News : अपघातात फसलेल्या वाहनाची मदत करणाऱ्या 6 तरुणांना आयशरने चिरडले

Beed News : अपघातात फसलेल्या वाहनाची मदत करणाऱ्या 6 तरुणांना आयशरने चिरडले

| Updated on: May 27, 2025 | 1:27 PM

Beed Accident : बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे. यात 6 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गवर काल रात्री 11 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात गेवराई येथील 6 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या सहा तरुणांच्या मृत्यूनंतर गेवराई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

गेवराई शहराजवळ असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

Published on: May 27, 2025 01:26 PM