Beed Crime : एवढी नौटंकी, तब्बल 40 मर्डर… लश्कर-ए-तोयबापेक्षा भयानक संघटना परळीत, मुंडेंवर घणाघात

Beed Crime : एवढी नौटंकी, तब्बल 40 मर्डर… लश्कर-ए-तोयबापेक्षा भयानक संघटना परळीत, मुंडेंवर घणाघात

| Updated on: Aug 02, 2025 | 3:27 PM

बीडमधल्या महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर आता तपासानं गती पकडली आहे. पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर बीडची बदनामी केल्याचं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना खासदार बजरंग सोनवणेनी प्रत्युत्तर दिलं आहे. लष्कर ए तोयबा पेक्षा भयानक संघटना परळीमध्ये असल्याची टीका सोनवणेनी केली आहे.

बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आणि पुढच्या काही तासातच पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेन ताब्यात घेतलं आहे. महादेव मुंडेंची निर्घृणपणे हत्या होऊन तब्बल 21 महिने उलटलेत. त्यानंतर ही पहिलीच कारवाई झाली आहे. तसंच संशयित आरोपी गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झालाय. हा तोच गोट्या गित्ते आहे जो सरपंच संतोष देशमुख हत्येतला मुख्य मास्टरमाईंड वाल्मिक कराडचा राईट हँड मानला जातो. तर ज्यांना पकडलं त्यांना सोडायचं नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक झाली. ज्यात आठ दिवसात आरोपींना अटक केली नाही तर बीड बेमुदत बंद राहणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ही ज्ञानेश्वरी मुंडेंचं म्हणणं ऐकून घेतलं. एसआयटीकडे तपास ही दिला तर ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटू नयेत म्हणून धनंजय मुंडेंनी प्रयत्न केले असा आरोप जरांगे यांनी केला आहे. तर एका प्रकरणात माझ्यासह बीड जिल्ह्याची 200 दिवस बदनामी केली असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्याला खासदार बजरंग सोनवणे यांनी उत्तर दिलं आहे. धनंजय मुंडेंची नौटंकी असून लष्कर ए तोयबापेक्षा भयानक संघटना परळीत असल्याचं सोनवणे म्हणाले आहेत.

 

Published on: Aug 02, 2025 03:27 PM