Santosh Deshmukh :  देशमुखांच्या घरी गेलेली अन् फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे ‘ती’ महिला कोण? मोठी माहिती समोर

Santosh Deshmukh : देशमुखांच्या घरी गेलेली अन् फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे ‘ती’ महिला कोण? मोठी माहिती समोर

| Updated on: Apr 26, 2025 | 12:06 PM

मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा दावा करत ठाण मांडून बसली होती. यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली. दरम्यान मस्साजोग येथील देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात एका महिलेचा वावर आढळून आल्याचे पाहायला मिळाले होते. ही महिला त्यांच्या घराजवळच ठाण मांडून बसली होती. इतकंच नाहीतर ही अज्ञात महिला फरार कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे असल्यााच दावा देखील करत होती. यानंतर ही महिला नेमकी कोण? असे सवाल केले जात असताना एक मोठी माहिती आता समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या घरी गेलेली महिला मानसिक रूग्ण असून मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांना भेटलेली महिला रत्नागिरीतील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर ही महिला रत्नागिरीतील असल्याची माहिती समोर येताच या महिलेचा शोध घेणं सुरू झालं असताना रत्नागिरीतील महिलेच्या घराला कुलूप असल्याचं सांगितलं जातंय.

Published on: Apr 26, 2025 12:06 PM