Beed : बीड विनयभंग प्रकरणातील आरोपी धनंजय मुंडेंसोबत? फोटो व्हायरल
Beed Molestation Case : बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचा धनंजय मुंडे यांच्यासोबतचा एक फोटो आता व्हायरल होत आहे.
बीड शहरातील खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना अटक केल्यानंतर काल बीड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान रात्री आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आणि आज मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली. पत्रकार परिषदेनंतर आज बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आरोपी विजय पवार याचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत, यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय.
Published on: Jun 30, 2025 03:45 PM
