Walmik Karad : कराडचे किती कारनामे? जुना सहकारी विजय बांगरनं मागचं सगळंच सांगितलं, ‘त्या’ दाव्यानं खळबळ

Walmik Karad : कराडचे किती कारनामे? जुना सहकारी विजय बांगरनं मागचं सगळंच सांगितलं, ‘त्या’ दाव्यानं खळबळ

| Updated on: Jul 03, 2025 | 9:13 AM

कधी काळी वाल्मिक कराडचे सहकारी राहिलेल्या विजय बांगर यांनी कराडवरून अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. बघा थेट पुरावे दाखवत काय काय केले कराडवर आरोप?

बीडच्या परळीतल्या महादेव मुंडे यांच्या हत्येसह अनेक खोट्या गुन्ह्यांबद्दल वाल्मिक कराडचे सहकारी राहिलेल्या विजय बांगर यांनी वाल्मिक कराडवर धक्कादायक आरोप केले आहेत. अनेक महिलांच्या अडून खोटे आरोप करणं, वाल्मिक कराडची जातीवाचक शिवीगाळ… अशा बऱ्याच गोष्टी विजय बांगर यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्यात. कराडने यापूर्वी खुद्द धनंजय मुंडे यांचे पीए राहिलेल्या प्रशांत जोशी यांचाच काटा काढण्याचा प्लॅन आखला होता असा दावाही बांगर यांनी केला आहे. विजय बांगर हे मूळ बीड जिल्ह्यातल्या पाटोद्याचे आहेत. सहकार क्षेत्रातल एक मोठ प्रस्थ अशी त्यांच्या कुटुंबाची ओळख होती. मात्र गेल्या काही वर्षात त्यांच्या कुटुंबियांवर विविध आरोप झाले त्यामुळे विजय बांगर यांच्यासह त्यांचे वडील रामकृष्ण बांगर, आई सत्यभामा बांगर यांना तुरूंगात जावं लागलं मात्र साऱ्या खोट्या केसेस आम्हाला संपवण्यासाठीच दाखल झाल्याचा आरोप विजय बांगर यांनी केलाय.

Published on: Jul 03, 2025 09:13 AM