सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार? कोर्टाचे आदेश काय?

सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार? कोर्टाचे आदेश काय?

| Updated on: Feb 16, 2025 | 2:09 PM

सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाने हे आदेश दिले आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या नावे ५ वाहनं तसेच धारूर आणि केजमध्ये बँक खाते आहे. हे सर्व जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस, एसआयटी आणि सीआयडी काम करत आहे. बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली होती. तसेच हा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. त्यानंतर तपास वेगाने सुरु आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतिक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला. मात्र आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला. त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

Published on: Feb 16, 2025 01:59 PM