bhagat Singh Koshyari Statement: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा निषेध

| Updated on: Jul 30, 2022 | 1:08 PM

'गुजराती आणि राजस्थानी लोकं महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्रात काय राहील?' असे विधान राज्यपालांनी एका कार्यक्रमात केले. यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Follow us on

राज्यपाल भगतसिंह कौशारी यांनी महाराष्ट्रीयन लोकांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोकं गुण्या गोविंदाने एकत्र राहतात, मात्र त्यात मिठाचा खडा टाकून कटुता वाढवत राहायची असे म्हणत रुप्रिय सुळे यांनी राज्यपालांवर ताशेरे ओढले. ‘गुजराती आणि राजस्थानी लोकं महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्रात काय राहील?’ असे विधान राज्यपालांनी एका कार्यक्रमात केले. यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राज्यपालाच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.