Mahadev Jankar यांच्या सभेच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडणारे Bhagwat Karad आता केंद्रात मंत्री

| Updated on: Jul 09, 2021 | 12:43 PM

1 मिनिट 24 सेकंदाचा हा व्हीडीओ आहे. हा व्हीडीओ 2016 सालचा आहे. ह्या व्हीडीओत राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर भाषण करतायत. तर सोफ्यावर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर, आणि नामदेव शास्त्रीही आहेत. भगवानगडावर जो दसरा मेळावा होतो, त्यावेळेसची ही सभा आहे.

Follow us on

1 मिनिट 24 सेकंदाचा हा व्हीडीओ आहे. हा व्हीडीओ 2016 सालचा आहे. ह्या व्हीडीओत राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर भाषण करतायत. तर सोफ्यावर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर, आणि नामदेव शास्त्रीही आहेत. भगवानगडावर जो दसरा मेळावा होतो, त्यावेळेसची ही सभा आहे. याच सभेत महादेव जानकारांनी चांगलीच फटकेबाजी केली होती. पंकजा मुंडे, राम शिंदे त्यावेळेस मंत्री होते. जानकरांच्या फटकेबाजीला टाळ्या पडत होत्या कारण ते मंत्री असूनही फडणवीस सरकारला कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टोले मारत होते. मुंडे भगिनी त्यावेळेसही फडणवीसांवर नाराज असल्याची चर्चा होतीच.

जवळपास पाच वर्षानंतर हा व्हीडीओ पुन्हा चर्चेत आहे. त्याला कारण आहेत ते केंद्रात नव्यानं मंत्री झालेले भागवत कराड. ह्या व्हिडीओत भागवत कराड जानकरांच्या मागे उभे आहेत. त्यावेळेस त्यांनी ह्या सभेचं सूत्रसंचलन केलं होतं. एक प्रकारे सभेचं स्टेज सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. व्हीडीओतही ज्यावेळेस गर्दी हुल्लडबाजी करायला लागली त्यावेळेस भागवत कराडांनीच त्या गर्दीला थोपवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. हा व्हीडीओ व्हायरल होतोय ते बदललेल्या परिस्थितीमुळे.