भास्कर जाधव यांनी वर्तविले शिंदे गटाचे भाकीत, म्हणाले, जानकर, खोत यांच्याप्रमाणेच

| Updated on: Jan 21, 2023 | 4:29 PM

सध्या जे सुरु आहे त्यामुळे भाजपच्या जुन्या नेत्यांना त्रास होतोय. भाजपचे पाप धुवत असताना गंगादेखील मैली होईल. महाविकास आघाडीमध्ये वाद नाही तर समन्वय आहे.

Follow us on

रत्नागिरी : ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव ( bhaskar jadhv ) यांनी महादेव जानकर ( mahadev jankar ) आणि सदाभाऊ खोत ( sadabhau khot ) या दोन नेत्यांचे भाजपच्या युतीत सध्या स्थान काय आहे असा सवाल केला. जानकर आणि खोतकर यांच्याप्रमाणेच शिंदे गटाचाही वापर होईल, असे भाकीत वर्तवले आहे.

छोटे पक्ष संपवण्याचा भाजपचा एककलमी कार्यक्रम देशात सुरु आहे. तर, राज ठाकरे आपल्या पक्षाला जनाधार मिळणार का याचा अंदाज घेत सुटले आहेत. त्यामुळे ते कुणाच्या कार्यक्रमाला गेले तर त्याबाबत बोलणे चुकीचे आहे, असे त म्हणाले.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून कायम ठेवावे आणि स्वायतत्ता राखावी असा टोलाही त्यांनी लगावला. दापोलीत पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असणार आहे. हे मी ठरवले आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले.