Pregnant Women Death Case : पुण्यातील गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून ‘या’ 5 प्रमुख मागण्या, सर्वात पहिल्यांदा…
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून सामान्य नागरिक आणि राजकीय नेते मंडळींमध्ये संतापाची भावना असताना भिसे कुटुंबीयांकडून पाच मागण्या करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौफेर टीका करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील ज्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तिच्या कुटुंबीयांकडून (भिसे) पाच मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी आणि पहिली मागणी म्हणजे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असणाऱ्या डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. यासह रूग्णाची खासगी माहिती सार्वजनिक कऱणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तर या प्रकरणातील गुन्हेगार पळून जाण्यापूर्वी त्यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी भिसे कुटुंबीयांकडून कऱण्यात आली आहे.
‘या’ आहेत 5 प्रमुख मागण्या
डॉ. घैसास यांना तत्काळ बडतर्फ करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा
डॉ. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
रूग्णाची खासगी माहिती लीक करणाऱ्यांवर कारवाई करावी
रूग्णाची खासगी माहिती लीक करणाऱ्यांचे लायसन्स रद्द करावे
ससून रूग्णालय समितीने पोलीस विभागाला त्वरीत अहवाल द्यावा
