Special Report | अभिनेते नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यानं वाद

| Updated on: Dec 30, 2021 | 11:19 PM

नसिरुद्दीन शाह यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत हरिद्वार धर्म संसदेत मुस्लिमांविरोधात केलेल्या चिथावणीखोर भाषणाबद्दल सविस्तर बोलले आहेत. ते म्हणाले होते, या लोकांना ते काय बोलतायत हे तरी कळतं की नाही. कारण ते जे काही बोलण्याचं प्रयत्न करतायत ते एक फुल्ल स्केल नागरी युद्ध आहे. मुस्लिमांना भयभीत करण्याचे, घाबरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याची पाकिस्तानातील लोकांमध्ये आणि तिथल्या प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून लोक भाजप आणि आरएसएसवरही निशाणा साधत आहेत. नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे देशाला गृहयुद्धाकडे नेणारी असल्याचे म्हटले होते. प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी हरिद्वार धर्म संसदेवर दिलेल्या वक्तव्याची पाकिस्तानात जोरदार चर्चा होत आहे. नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानच्या मीडियासह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले नसिरुद्दीन शाह

नसिरुद्दीन शाह यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत हरिद्वार धर्म संसदेत मुस्लिमांविरोधात केलेल्या चिथावणीखोर भाषणाबद्दल सविस्तर बोलले आहेत. ते म्हणाले होते, या लोकांना ते काय बोलतायत हे तरी कळतं की नाही. कारण ते जे काही बोलण्याचं प्रयत्न करतायत ते एक फुल्ल स्केल नागरी युद्ध आहे. मुस्लिमांना भयभीत करण्याचे, घाबरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही मुस्लिम 20 कोटी (200 मिलियन) आहोत. हा आकडा खूप साधा का वाटतो? आम्ही 20 कोटी लढू, आम्हा 20 कोटी मुस्लिमांचा ह्याच देशावर दावा आहे, आम्हा 20 कोटींसाठी हीच मातृभूमी आहे. आम्ही इथेच जन्मलोत. आमच्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या आणि गेल्या. आणि मला खात्रीय, की जर कुणी असा मुस्लिमांविरोधात प्रयत्न केलाच तर त्याचा प्रचंड विरोध केला जाईल. ती प्रतिक्रिया संतप्त असेल.’ नसिरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्याला पाकिस्तानच्या मीडियाने पाठींबा दिला आहे.