काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु, प्रभारी एच के पाटील लवकरच मुंबई दौऱ्यावर
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या अंतर्गत धुसफुसीची गंभीर दखल दिल्ली हायकमांडने घेतली आहे.
मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या अंतर्गत धुसफुसीची गंभीर दखल दिल्ली हायकमांडने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 12 फेब्रुवारीला पाटील मुंबईत येत असून ते महाराष्ट्रातील नेत्यांसमवेत चर्चा करणार आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरु झालेला हा वाद आता काँग्रेस फुटीवर येऊन पोहोचला आहे. आधीच महाराष्ट्रात पक्ष कमकुवत झाला आहे. त्याला बळ देण्याऐवजी नेतेच वादात गुरफटले आहेत. त्याची दखल घेऊन प्रभारी एच. के. पाटील याना मुंबईत पाठविण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
Published on: Feb 09, 2023 08:24 PM
