Pakistan Bomb Blast : पाकिस्तान हादरला… पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

Pakistan Bomb Blast : पाकिस्तान हादरला… पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

| Updated on: Apr 28, 2025 | 7:13 PM

पाकिस्तनामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान तालिबानचा जाहीरपणे विरोध करणाऱ्या शांतता समितीच्या कार्यालयाला बॉम्बने लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. पाकिस्तानातील पेशावर येथे झालेल्या बॉम्बस्फोट सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. पाकिस्तानमध्ये असणाऱ्या शांतता कमिटीच्या ऑफिसमध्ये हा बॉम्बस्फोट झाला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील दक्षिण वझिरीस्तानमधील सरकार समर्थक असणाऱ्या शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटाचा संशय टीटीपी म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानवर व्यक्त केला जात आहे. टीटीपी अनेकदा सुरक्षा दल, नागरिक आणि पाकिस्तानी राज्याशी सहकार्य करत असलेल्या संघटनांना लक्ष्य करत असल्याचे सांगितले जाते.

Published on: Apr 28, 2025 07:13 PM