Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले यांचं निवडणूक चिन्ह ठरलं, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून रिंगणात; मी जिंकलो तर….
'सातारा शहरात असणारी समाज मंदिर आणि देवालय यांचा मी उद्धार करणार.... बिग बॉस मध्ये मी नाव कमावलं.. मी संविधान वादी जरी असलो तरी मी ईश्वराला आणि अल्लाला मानणार आहे ', बघा काय म्हणाले बिचकुले?
सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. चिन्ह वाटपामध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे दूरदर्शन संच हे चिन्ह मिळाले असल्याचे घोषित केले आहे. यावेळी त्यांनी मागील 2004 सालापासून मला दूरदर्शन संच हे चिन्ह सर्व निवडणुकीमध्ये वापरत आहे. आता नागरिकांच्या बहुमोल मताने प्रथम नागरिक होण्याचा मान मला मिळणार आहे. मी नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना माझ्या बाबत काय झालं हे माझा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना पत्रकार परिषदेत सांगणार आहे, असे त्यांनी सांगितले तर सातारा शहरात अजून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी जर नगराध्यक्ष झालो तर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो की ज्या शाळेत डॉक्टर आंबेडकर शिकले त्या शाळेला राष्ट्रीय स्मारक बनवणार असल्याचे आश्वासनही बिचकुले यांनी दिले.
