Bihar DCM : उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, ‘तुमच्या छातीवर बुलडोझर चालवू’, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी

Bihar DCM : उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, ‘तुमच्या छातीवर बुलडोझर चालवू’, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी

| Updated on: Nov 08, 2025 | 10:13 PM

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या गाडीवर लखीसराय जिल्ह्यात ग्रामस्थांनी शेण फेकल्याची घटना घडली. खराब रस्त्यांवरून स्थानिकांनी जाब विचारल्यानंतर सिन्हा यांनी त्यांना गुंड संबोधत छातीवर बुलडोझर चालवण्याची धमकी दिली. त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते विजय सिन्हा यांच्या गाडीवर लखीसराय जिल्ह्यातील एका गावात ग्रामस्थांनी शेणफेक केल्याची घटना समोर आली आहे. गावात खराब रस्ते असल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीला घेराव घालत त्यांचा निषेध केला. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी या घटनेमागे राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) गुंडांचा हात असल्याचा दावा केला. सिन्हा यांनी यावेळी ग्रामस्थांना थेट छातीवर बुलडोझर चालवण्याची धमकी दिली.

तसेच, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा आरोप करत, पोलीस गोळ्या का चालवत नाहीत? असा प्रश्न केला. ग्रामस्थांनी गाडीवर शेण, दगड आणि चप्पल फेकल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी बूथ कॅप्चरिंग आणि आपल्या प्रतिनिधींना मतदान केंद्रातून हाकलून लावल्याचा आरोपही सिन्हा यांनी केला होता, मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Published on: Nov 08, 2025 10:13 PM