MLC Election Video : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, ‘हे’ 3 उमेदवार जाहीर
विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीत भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच यासंदर्भात एक मोठी बातमी आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव ठरवण्यात आली असून आज ती नावं जाहीर करण्यात आली आहेत. सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असताना या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले आहे. महायुतीच्या तिनही पक्षाकडून उमेदवारांची चर्चा सुरू असतना संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. जे उमेदवार विधान परिषदेवर निवडून गेलेत त्या जागांवर विधान परिषदेची निवडणूक होत आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना उद्या अर्ज दाखल करायचा आहे. संदीप जोशी हे नागपूरमधील असून त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख आहे. संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे तर दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारल्यानंतर आता त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.
