Ashish Shelar : शिवतीर्थावरील चाफा…चाफा खंत करी काही केल्या फुले ना.. शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
भाजप नेते आशिष शेलार यांनी कविता ट्विट करत ठाकरे बंधूंवर (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) जोरदार टीका केली आहे. बंधुप्रीतीची ओढ लागलेल्या "भयभीत उबाठा सेनेला" ही कविता अर्पण करत त्यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिमटा काढला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी कविता ट्विट करत ठाकरे बंधूंवर (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) जोरदार टीका केली आहे. बंधुप्रीतीची ओढ लागलेल्या “भयभीत उबाठा सेनेला” ही कविता अर्पण करत त्यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिमटा काढला.
आशिष शेलारांचं ट्विट नेमकं काय?
शिवतीर्थावरील चाफा !! “चाफा” बोलेना चाफा चालेना… चाफा खंत करी काही केल्या फुले ना… गेले संजय राऊत घरी… म्हटली मैत्रीची गाणी… आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे गेले अनिल परब सोबती… गंध दरवळला शिवतीर्थावरी जुने मतभेद विसरले रे चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम ! तरी ही चाफा बोले ना.. चाफा चालेना… चाफा काही केल्या फुले ना !! (कवी बी यांची क्षमा मागून बंधूप्रितीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला अर्पण)