Kirit Somaiya | सोमय्या प्रकरणावर केंद्राचं बारीक लक्ष, जे. पी. नड्डांना भाजप नेत्यांकडून माहिती

| Updated on: Sep 20, 2021 | 9:49 AM

या सर्व प्रकरणावर केंद्रही लक्ष ठेवून आहे. किरीट सोमय्या प्रकरणावर केंद्राचं बारीक लक्ष आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांनी भाजप नेत्यांकडून सोमय्या प्रकरणाची माहिती घेतली.

Follow us on

पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याच्या अधिक माहितीसाठी सोमय्या कोल्हापूरकडे जात होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली. किरीट सोमय्या सध्या कराडच्या शासकीय विश्रामगृहात आहेत.

किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहावर आहेत. सकाळी 9 वाजता सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद आटोपून सोमय्या मुंबईसाठी रवाना होणार आहेत. यावेळी ते हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळ उघड करणार आहेत.

या सर्व प्रकरणावर केंद्रही लक्ष ठेवून आहे. किरीट सोमय्या प्रकरणावर केंद्राचं बारीक लक्ष आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांनी भाजप नेत्यांकडून सोमय्या प्रकरणाची माहिती घेतली.