मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला?

मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला?

| Updated on: Nov 30, 2023 | 3:52 PM

मराठा आरक्षणावरून रान पेटल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणावर चांगलीच खडाजंगी होताना दिसतेय अशातच आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलेय

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : राज्यात मराठा आरक्षणावरून रान पेटल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणावर चांगलीच खडाजंगी होताना दिसतेय अशातच आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. मराठा समाज कधीच ओबीसीमधून आरक्षण घेणार नाही. आरक्षणासंदर्भात भारतीय घटनेमध्ये कोणत्या तरतूदी आहेत. त्याचा मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा, तर मनोज जरांगे पाटील लहान आहेत. आरक्षण कसं मिळतं याचा त्यांनी अभ्यास करावा, असा खोचक सल्लाही नारायण राणे यांनी दिला तर जनतेला माहिती आहे माझा अभ्यास आहे की नाही असे म्हणत राणेंच्या खोचक सल्ल्यावर जरांगे पाटील यांनी पलटवार केलाय.

Published on: Nov 30, 2023 03:52 PM