Nazakat Ali : ‘…त्यानं जीवाची बाजी लावली अन् पर्यटकांना वाचवलं’, भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट

Nazakat Ali : ‘…त्यानं जीवाची बाजी लावली अन् पर्यटकांना वाचवलं’, भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट

| Updated on: Apr 25, 2025 | 2:33 PM

पर्यटकांचे जीव वाचवणाऱ्या नजाकत अली भाईंचे भाजप नेता अरविंद अग्रवाल यांनी आभार मानले आहेत. नजाकत अली यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे प्राण वाचवले आहे. अरविंद अग्रवाल हे भाजप युवा मोर्चाशी संबंधित असून ते पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत.

काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. हा हल्ला झाला तेव्हा छत्तीसगडमधील चिरमिरी येथील चार कुटुंबांचा एक ग्रृपही पहलगाममध्ये उपस्थित होता, परंतु तेथील स्थानिक रहिवासी नजाकत अली यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांचे प्राण वाचवल्याचे पाहायला मिळाले. अशातच पहलगाम हल्ल्यानंतर भाजप नेत्याची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. भाजप नेते अरविंद अग्रवाल यांनी लोकांचे जीव वाचवणाऱ्या नजाकत अलीचे आभार मानले आहेत.

मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अरविंद अग्रवाल यांचे कुटुंबही काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. या हल्ल्यादरम्यान अग्रवाल यांच्या कुंटुंबासह सोबत असलेल्या ग्रुपला काश्मीरच्या फिरवण्यासाठी सोबत घेऊन निघालेल्या नजाकत अलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या सर्वांचे प्राण वाचवले. दरम्यान, ते आता घरी पोहोचल्यानंतर अरविंद अग्रवाल यांनी नजाकत अली यांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले की, “तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचवले. नजाकत भाईच्या उपकाराची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही.”

Published on: Apr 25, 2025 02:33 PM