Ashish Shelar | तुम्ही सत्तेसाठी सलगी केली त्याचं काय ? – आशिष शेलार

Ashish Shelar | तुम्ही सत्तेसाठी सलगी केली त्याचं काय ? – आशिष शेलार

| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 6:40 PM

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील काही मुद्द्यांवरुन भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या याच टीकेवर आशिष शेलारांनी पलटवार दिला. यावेळी ठाकरे यांनी भाजप महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यावर शेलार यांनी तुम्ही सत्तेसाठी सलगी केली त्याचं काय? असा सवाल विचारत पलटवार केला.