Special Report | गाय कापली? काँग्रेस जिकंली, आशिष शेलार यांचा ‘तो’ दावा खरा की खोटा?

| Updated on: May 22, 2023 | 7:12 AM

VIDEO | गाय कापल्याचा व्हिडीओ दाखवत शेलार यांचा काँग्रेसवर आरोप, नेमका व्हिडीओ कधीचा? बघा व्हिडीओ

Follow us on

मुंबई : कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर विजयाच्या उन्मादामध्ये तिथे काहींनी गाय कापली, असा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. तोच व्हिडीओ भाजप नेते आशिष शेलार यांनी जाहीर कार्यक्रमात दाखवत विरोधकांवर टीका केली. मात्र या व्हिडीओचं सत्य नेमकं काय आहे. शहाःनिशा करा, असं म्हणतांना शेलार यांनी थेट काँग्रेसचं नाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलाय. नवं सरकारही बसलंय. पण निकालानंतर जो व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची कोणतीही शहाःनिशा न करता जाहीर कार्यक्रमात ते तो व्हिडीओ दाखवलाय. तर माध्यमांना व्हिडीओची सत्यता पडताळण्याचं आवाहनही केलंय. पण त्यांनी तो व्हिडीओ कर्नाटकचं असल्याचे सांगितले. दाखवलेला व्हिडीओहा कर्नाटकचा असल्याचे सत्य मानून जमलेल्या लोकांनाही शेम शेम अशा घोषणा दिल्यात. पण हा व्हिडीओ मुळात कर्नाटकचा नाहीच आहे. शेलारांनी काँग्रेसचं नाव घेत जो व्हिडीओ जाहीर कार्यक्रमात दाखवला तो दावा पूर्णपणे खोटाय. अनेक माध्यमांनी त्यांची सत्यता गेल्या चार दिवसांपूर्वी पडताळल्याचे सांगितले. मग हा व्हिडीओ नेमका कुठलाय…? बघा स्पेशल रिपोर्ट