Ashish Shelar | जुन्या फोटोचा असंबंध दाखला देत सरकारच अपयश लपवण्याच काम करु नका : आशिष शेलार

| Updated on: Nov 15, 2021 | 9:02 PM

जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, असा इशाराच आशिष शेलार यांनी मलिकांना दिलाय.

Follow us on

YouTube video player

मुंबई : अमरावतीमधील दंगलीनंतर आता राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. शेलार यांचा एक फोटो दाखवत मलिक यांनी, शेलारांनी रझा अकादमीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. हा षडयंत्राचाच भाग होता का? असा सवाल केलाय. मलिकांच्या या आरोपाला आता शेलार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन 2016 -17च्या फोटोचं संबंध काय?
माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, असा इशाराच आशिष शेलार यांनी मलिकांना दिलाय. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही फोटोचं राजकारण बंद करावं, असं आवाहनही शेलारांनी केलंय.