जुनी पेन्शन योजनेवर भाजपचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला, जुनं रडणार सरकार
काँग्रेसकडूण विविध मागण्यासह जुन्या पेन्शन योजनेसाठी राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून भाजप नेते कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. पाठोपाठ काँग्रेसकडूनही विविध मागण्यासह जुन्या पेन्शन योजनेसाठी राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून भाजप नेते कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर हल्ला केला आहे. त्यांनी, 2005 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करत अंशदायी पेन्शन योजना सुरू केली. तिच आताही सुरू आहे. मात्र आता काँग्रेसकडून शेतकऱ्यांसह इतर प्रश्नावर मोर्चा काढला जाणे हे समजू शकतो पण जुनी पेन्शन योजनेवर मोर्चा काढणे म्हणजे सत्ता न येण्याचं टेन्शन दूर करणे. जुनी पेन्शन योजना रद्द त्यांनीच केली, दोन वर्षे सत्य तेच होते. त्यामुले सत्तेत गेल्यानंतर ते सत्य विसरतात का? जेव्हा मनुष्य प्राण्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा काँग्रेस बद्दल मात्र एक स्वतंत्र चाप्टर केलं पाहिजे असा टोला ही त्यांनी लगावला.
