Devendra Fadnavis | नागपुरात मेट्रोमुळे विकासात वाढ होणार – देवेंद्र फडणवीस
नागपूरची मेट्रो कशी नागपूरच्या विकासात वाढ करत आहे याचा किती फायदा होणार आहे, मेट्रोच्या माध्यमातून नागपूरच्या आजूबाजूची शहरंसुद्धा जोडली जाणार असल्याने नागपूरच्या विकासात काय फरक पडेल हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मेट्रोचा प्रवास करण्याचा आनंद घेतला. झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क दरम्यान सुरू झालेल्या लाईनवर आज पहिल्यांदा मेट्रो धावली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. नागपूरची मेट्रो कशी नागपूरच्या विकासात वाढ करत आहे याचा किती फायदा होणार आहे, मेट्रोच्या माध्यमातून नागपूरच्या आजूबाजूची शहरंसुद्धा जोडली जाणार असल्याने नागपूरच्या विकासात काय फरक पडेल हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
