Kirit Somaiya | दापोलीतील रिसॉर्ट नक्की कुणाचे?, साई रिसॉर्टवर कारवाई का नाही?
हे बांधकाम न पाडल्याने दापोली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात मंडळ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 कलम 52 आणि 53 गुन्हा नोंदविला आहे. याबाबत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आता संशय व्यक्त केला आहे.
मुंबई : किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याशी संबंध जोडलेल्या साई रिसॉर्टच्याच सर्वे क्रमांकावर असलेल्या सी कोच रिसॉर्ट विरोधात दापोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे समोर आल्याने याला उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचे मालक पुष्कर मुळे यांना बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती. मात्र हे बांधकाम न पाडल्याने दापोली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात मंडळ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 कलम 52 आणि 53 गुन्हा नोंदविला आहे. याबाबत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आता संशय व्यक्त केला आहे. हे रिसॉर्ट कोणाचे आहे? आणि साई रिसॉर्टवर कारवाई का नाही? असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.
Published on: Jun 03, 2022 12:16 AM
