Parinay Fuke | ‘संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय’

Parinay Fuke | ‘संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय’

| Updated on: Jan 17, 2026 | 1:38 PM

'महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड आहे ते म्हणजे देवभाऊ आहे'. काल ज्या प्रकारे जनतेने महायुतीला साथ दिली त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, महाराष्ट्रात आता कोणी शिल्लक राहिलं नाही असं वक्तव्य करत फुकेंनी थेट विरोधकांना टोला लगावला आहे.

महापालिका निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते परिणय फुके यांनी त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फुके म्हणाले ‘महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड आहे ते म्हणजे देवभाऊ आहे’. काल ज्या प्रकारे जनतेने महायुतीला साथ दिली त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, महाराष्ट्रात आता कोणी शिल्लक राहिलं नाही असं वक्तव्य करत फुकेंनी थेट विरोधकांना टोला लगावला आहे.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होत, शिंदेंनी गद्दारी केली नसती तर भाजपाचा महापौर मुंबईत झाला नसता, यावर परिणय फुके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, उद्धव ठाकरेंनी आता आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. संजय राऊतांनी त्यांचे सकाळचे ९ चे भोंगे बंद केले पाहिजे. त्या भोंग्यांमुळेच ह्यांची अशी अवगती होतं आहे.

Published on: Jan 17, 2026 01:38 PM