माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान करुन पाहिले तर…..सत्यजीत कदम यांचा विरोधकांना गर्भित इशारा
भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी विरोधकांना काय विकासाचे सुचवायचे असले तर बिनधास्त समोर या पण उगाच स्टंटबाजी करायला जाऊ नका असा इशारा विरोधकांना दिला आहे.
माझ्या राजकारणाचे दिवस समाजकार्यापुरते आहेत. त्यानंतर मी समाजकारण करत असतो. त्यामुळे माझे सर्वांना सांगणे आहे की कुणी उगच बळच शेपटावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करायला जाऊ नका, उगच आमच्या लोकांना त्रास द्यायला जाऊ नका, उलट मी विरोधकांना आव्हान करतो की आपल्या गावाचा विकास करण्यासाठी काही सुचवायचं असेल काही कामे मांडायची असतील तर योग्य पद्धतीने मांडा उगच काही स्टंटबाजी करायला जाऊ नका असे भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी नगर येथील मेळाव्यात म्हटले आहे. वाघीण बरेच लिहीतेय पण वेळ आली तर परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम हेही भाजपाचे सुत्र आहे. मला समोरच्या एक गोष्ट सांगायची आहे. बऱ्याच गोष्टी कानावर येत आहेत. मी आता संयम ठेवायला शिकलोय २०१६ पासून मला कोणी हातात दांडा घेतलेले पाहिले नसेल पण हातात घ्यायचे विसरलेलो नाही असेही कदम यांनी म्हटले आहे. मला जर असे काही कळाले. कळत नाही असे बिलकूल नाही मी अजून संयम ठेवून आहे. पण माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान करुन पाहिले तर तंगड्या काढल्या शिवाय राहणार नाही असा इशारा कदम यांनी दिला आहे.
