Breaking | परिवहन मंत्री अनिल परबांच्या अडचणी वाढणार?

| Updated on: Aug 26, 2021 | 9:05 AM

राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबतची परब यांची एक व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे. त्यावरुन राणे यांनी आता या प्रकरणात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा यांना जामीन मिळाला. मात्र, राज्य सरकारच्या या कारवाईनंतर नारायण राणे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबतची परब यांची एक व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे. त्यावरुन राणे यांनी आता या प्रकरणात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात आता भाजप आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. अनिल परब यांच्या एका प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असं राणेंनी म्हटलंय. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.