Nitesh Rane : हमाम मैं सब नंगे… घरात पैसे तर चूक काय? जो नियम आम्हाला तोच…. नितेश राणेंचं सडेतोड उत्तर
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मुद्द्यांवरून चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नितेश राणे यांनी घरात व्यवसायासाठी पैसे ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित करत "जो नियम आम्हाला लागतो, तो सगळ्यांना लागणार" असे म्हटले. हमाम में सब नंगे है या त्यांच्या विधानाने लक्ष वेधले. राजकीय कार्यकर्ते असण्यापूर्वी प्रत्येकाचे स्वतःचे व्यवसाय आणि गुंतवणूक असते, असे राणे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत पैशांचा वापर करून मते मागितली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, कामावर नव्हे, तर पैशांवर आणि निधीवर मते मागितली जात आहेत, हे योग्य नाही. निवडणुकीत अर्थकारण आणून जिंकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर याच राजकीय धामधुमीत नितेश राणे यांनी स्वत:च्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर काय चूक? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी हमाम में सब नंगे है असे म्हणत, जो नियम एकाला लागू होतो तो सगळ्यांना लागू होईल असा इशारा दिला. राजकीय कार्यकर्ते असण्यापूर्वी प्रत्येकाचे स्वतःचे व्यवसाय, नोकऱ्या आणि गुंतवणुकी असतात. घरात किंवा कार्यालयात व्यवसायासाठी पैसे ठेवल्यास चूक काय, असा त्यांचा प्रश्न होता. यावर निष्पक्ष चौकशीची मागणी करत, दोषींवर कारवाई निश्चित केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.
