Babanrao Lonikar : भाजपचे बबनराव लोणीकर बरळले, बघा काय-काय नको ते बोलून गेले, सामान्य माणसाचा बापच काढला
'तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले आहेत. अशी मगरुरीची भाषा भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी वापरली आहे. गावातल्या काही टिकाकारांवर बोलताना लोणीकरांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. शिवाय तुमच्या आई बहिण आणि बायकोला लाडकी बहिणीचे पैसे आम्हीच देतो. तुमच्या अंगावरचे कपडे आणि बूटही आम्हीच दिलेत, अशी भाषा सुद्धा लोणीकरांनी वापरली आहे.
भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी आपली बरळण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कट्ट्यावर बसणाऱ्या गावातील मुलांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांना पेरणीचे पैसे सरकार देत असल्याचं सांगत लोणीकरांनी एकप्रकारे उपकाराची भाषा केली आहे. कपडे बूट आणि मोबाईलही सरकारच देत असं सांगत लोणीकरांनी सामान्य जनतेला अक्षरशः भिकारी ठरवलं आहे. लोणीकरांच वादग्रस्त वक्तव्य ऐका… कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणाच्या आईचा पगार त्यांनी दिलाय, तरुणाच्या वडिलांना पेन्शनही त्यांनीच दिली आहे, तरुणाच्या वडिलांना पेरणीसाठी 6000 रुपये पंतप्रधान मोदींनी दिले, तरुणाच्या बायकोला बहिणीला आणि आईला लाडक्या बहिणीचे पैसे दिलेत, तरुणाच्या अंगावरचे कपडे सरकारने दिले, तरुणाच्या पायातली चप्पल आणि बूटही सरकारमुळे आहे, तरुणाच्या हातातला मोबाईलही सरकारमुळे आहे. बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार पलटवार केलाय. बघा कोण काय-काय म्हणाले?
