आजोबा आणि नातवाने सत्तेचा गैरवापर केला; शरद पवार, रोहित पवार यांच्यावर भाजप नेत्याची टीका

| Updated on: May 28, 2023 | 9:38 AM

शरद पवार आणि रोहित पवार हे चौंडेश्वरी, रायगडावर गेले नाहीत. त्यांच्यात तेथे दुसरा मंडप मारण्याची धमक नाही. येथे मऊ जमीन लागली म्हणून खणायचं सुरू आहे. पण तेथे गेले असते तर लोक त्यांना ठोकून काढतील असे शब्द वापरले आहेत. तर आजोबा आणि नातवाने सत्तेचा गैरवापर केल्याची टीका करताना फक्त शरद पवार यांनी नातवाला पुढे आणण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा वापर केला.

Follow us on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून राज्यात जोरदार राजकारण सुरू झाले आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी शरद पवार आणि रोहित पवार हे चौंडेश्वरी, रायगडावर गेले नाहीत. त्यांच्यात तेथे दुसरा मंडप मारण्याची धमक नाही. येथे मऊ जमीन लागली म्हणून खणायचं सुरू आहे. पण तेथे गेले असते तर लोक त्यांना ठोकून काढतील असे शब्द वापरले आहेत. तर आजोबा आणि नातवाने सत्तेचा गैरवापर केल्याची टीका करताना फक्त शरद पवार यांनी नातवाला पुढे आणण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा वापर केला. तर याच्याआधी अण्णासाहेब डांगे, महादेवराव जानकर आणि तेथील समाजाकडून जयंती केली होती. मात्र आत्ताच त्या ठिकाणी रोहित पवार कसे उगवले. शरद पवारसाहेब चार वेळेस मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, राज्यात त्यांची सत्ता होती त्यावेळी ते जयंतीला का आले नाहीत. ते गेल्या वर्षीच जयंतीला का आले? असा घणाघात केला आहे. त्याचबरोबर जयंतीच्या वेळी जर राजकारण झाले तर आजोबा आणि नातवाला पश्चाताप होईल, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.