Gopichand Padalkar : ‘ज्यावेळी तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी…’, पडळकरांचा पलटवार, नेमका रोख कोणावर?

Gopichand Padalkar : ‘ज्यावेळी तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी…’, पडळकरांचा पलटवार, नेमका रोख कोणावर?

| Updated on: Apr 17, 2025 | 6:09 PM

'संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळांनो तुम्ही मला सांगण्याची आवश्यकता नाही. बिरोबा हा माझा देव आहे चोंबड्यानो, तुम्ही कधी बिरोबाच्या पाया पडला आहात का?', असा सवाल पडळरांनी केला आणि संभाजी ब्रिगेडवर हल्लाबोल केला.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुरज चव्हाण यांच्या टीकेवर बोलताना जोरदार पटलवार केलाय. सुरज चव्हाण यांनी आमदार गोपीचंद पडळकर हे दरोडेखोर असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला सोलापूरातून पडळकरांनी उत्तर दिलंय. ‘दरोडेखोर मला राष्ट्रवादीवाले म्हणतात, मी या विषयावर कधी बोललो नाही. माझ्यावर जेव्हा मंगळसूत्र चोरीचा आरोप लावला. 2009 साली त्यांचा अपक्ष आमदार ज्याला 17 अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दिला होता. मला 19 हजार मते पडली आणि तो गडी दोन अडीच हजार मतांनी पडला. स्वर्गीय आर आर पाटील हे त्यावेळेस गृहमंत्री होते, त्यावेळेस ते त्यांचे मानस बंधू होते. त्यावेळेस आटपाडीत दगड जरी पडला. त्यावेळेस केस व्हायची. एक लग्न होतं आणि त्या लग्नाच्या पत्रिकेत मी प्रमुख पाहुणा होतो. त्या लग्नात भांडणं झाली. त्या वेळेस उपस्थित नव्हतो तरीही माझ्यावर केस झाली.’, असं म्हणत पडळकरांनी काँग्रसेवर हल्लाबोल केला. तर हे सर्व राष्ट्रवादीचच पाप आहे. या बिनडोक लोकांना माहिती नाही मी 22 वर्षाचा असल्यापासून सफारी गाडीतून फिरतोय. त्यावेळी त्यांना चड्ड्याही घालायला नव्हत्या. मी धनगराचा पोरगा आहे असल्या चोऱ्यमाऱ्या करण्याची आमची औलाद नाही, असं म्हणत त्यांनी जिव्हारी लागणारा पलटवार केलाय.

Published on: Apr 17, 2025 06:09 PM