Special Report | Nitesh Rane यांची पोलिसांकडून ‘परेड’!-TV9

Special Report | Nitesh Rane यांची पोलिसांकडून ‘परेड’!-TV9

| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 3:19 PM

नितेश राणेंना वेगवेगळ्या ठिकाणी नेत पोलिसांनी त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. आणि काही वेळात राणेंना मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्यात नेत पोलिसांनी गोव्यातल्या हॉटेलचाही तपास केला. त्यामुळे संतोष परब हल्ला प्रकरणाचं कनेक्शन गोव्यात आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात कालच नितेश राणे पोलिसांना शरण आले आहेत. कोर्टाने राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे पोलिसांना वेळ कमी असल्याने तपासाचा वेग जास्त वाढवला आहे. सकाळपासून नितेश राणेंची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सकाळीच पोलिसांनी राकेश परब आणि नितेश राणेंची समोरासमोर चौकशी केली. त्यानंतर नितेश राणेंना वेगवेगळ्या ठिकाणी नेत पोलिसांनी त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. आणि काही वेळात राणेंना मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्यात नेत पोलिसांनी गोव्यातल्या हॉटेलचाही तपास केला. त्यामुळे संतोष परब हल्ला प्रकरणाचं कनेक्शन गोव्यात आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नितेश राणेंना कोठडी मिळाल्यापासून राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. गोव्यात आता पोलिसांची हाती काय लागलंय? हे तपासानंतरच कळेल.

Published on: Feb 03, 2022 08:34 PM