शरद पवार यांनी शिवसेना फोडली, बघा काय केला भाजप आमदारांनं गंभीर आरोप?
VIDEO | शिवसेना फोडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला अन् राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवसेना फोडली, बघा नेमका काय केला आरोप?
सोलापूर : शिवसेना फोडण्याचा यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न झाला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील शिवसेना फोडली असा गंभीर आरोप भाजपचे आमदार राम शिंदे यांनी आज पंढरपुरात केला.छगन भुजबळ हे देखील शिवसेनेतून फुटून आज ते शरद पवार यांच्या जवळ आहेत. एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली शिवसेनेत सर्वात मोठ्या स्वरूपात बंड करण्यात आले. या बंडामुळे शिवसेनेची आणि हिंदुत्वाची विचारधारा असलेले लोकं एका बाजूला आले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिवसेनेची फाटाफूट करण्यात मोठा हात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा आहे. त्यामुळे तेच खरे शकुनी मामा आहे, असा खोचक टोलाही राम शिंदे यांनी लगावला आहे.
Published on: Feb 19, 2023 09:14 PM
