Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचा ‘शॉक’ भाजपवाले अवाक; म्हणाले, मंत्रिपद गेलं तरी चालेल पण…

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचा ‘शॉक’ भाजपवाले अवाक; म्हणाले, मंत्रिपद गेलं तरी चालेल पण…

| Updated on: Jul 04, 2025 | 10:25 AM

Maharashtra Solar Pump Policy: सत्ताधारी आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार पुन्हा विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोलार धोरणाचे मुनगंटीवारांनी अक्षरशः वाभाडेच काढले. उर्जा खात्यावर सवाल करताना शेतकऱ्यांपुढे येणाऱ्या अडचणींचा त्यांनी सभागृहात पाढाच वाचला होता.

सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारच्या कारभाराचे बाभडे काढले. कृषी पंपाच्या धोरणावरून मुनगंटीवारांनी फडणवीसांकडे असलेल्या उर्जा खात्यावर टीकास्त्र डागलं. कृषीपंप द्या म्हणून हजारो शेतकऱ्यांचे अर्ज सरकारकडे आले आहेत. मात्र सरकार त्यांना बळजबरीने सोलार पंप थोपवत असल्याचा मुनगंटीवार म्हणाले. कृषी पंप हवेत म्हणून महाराष्ट्रामधल्या 47 हजार 197 शेतकऱ्यांनी चेक भरले. पण सरकारने आता फक्त सोलार पंप घ्या असं म्हणत त्यापैकी तब्बल 45 हजरा 114 चेक परत केले आहेत. शिवाय ज्या कंपन्यांचे सोलार पंप सरकारने दिलेत, त्यापैकी अनेक नादुरुस्त आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार जिथे भूजल पातळी खोल आहे तिथे सोलार पंपाला मर्यादा येतात. मोठ्या शेतीसाठी सोलार पंपाची कार्यक्षमता अपुरी पडते. मात्र दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना सोलार पंपच देण्यासाठी आग्रही आहे. याशिवाय डीपी कनेक्शन सुद्धा लवकर मिळत नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 04, 2025 10:20 AM