सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती नेमका कोण?
ज्या धनंजय मुंडेंच्या विरोधात सुरेश धसाणी विविध आरोपांचं मोहोळ उठवलं तेच मोहोळ धसाच्या एका भेटीनं तापलं आहे. मात्र भेट सर्वांसमोर घेऊनही आपल्या विरोधात एक षड्यंत्र रचलं गेल्याचा आरोप सुरेश धसांनी केला आहे. धसांचा रोख नेमका कुणाकडे आहे? धसांनी गेम केला होता की मग धसाचाच गेम झाला अशी ही चर्चा सध्या सुरू आहे.
धनंजय मुंडेना भेटून भाजपचे सुरेश धस यांनी गेम केला? की मग मुंडेच्या भेटीन सुरेश धस यांचाच गेम झाला असा मोठा प्रश्न खुद्द धस यांच्या आरोपानं उभा राहिला आहे. या संपूर्ण प्रकरणात सुरेश धसांसह भाजपचे बावनकुळे यांचीही भूमिका रंजक आहे. मागच्या काही दिवसात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या दोन भेटी झाल्या. एक भेट भाजपच्या बावनकुळेंच्या घरी झाली. ही भेट खुद्द बावनकुळे यांनीच घडवून आणली. या भेटीमागे धस-मुंडे यांच्यातील गैरसमज दूर व्हावे असा बावनकुळेंचा हेतू होता. यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून बावनकुळे प्रयत्नशील होते. धनंजय मुंडे सोबतची दुसरी भेट मुंबईतल्या मुंडेंच्या घरी स्वतः सुरेश धस यांनी घेतली. या मागचं कारण शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करणं होतं असं धस म्हणताहेत. सुरेश धस यांचं म्हणणं आहे की या भेटी गुप्त नाही तर लोकांसमोर झाल्या. फक्त त्याच्या बातम्या लीक करण्यात आल्या त्यामागे एक व्यवस्थित षड्यंत्र रचलं गेलं होतं ते कोणी रचलं याचही नाव आपल्याला माहिती आहे. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातलं जाईल असं सुरेश धस सांगताहेत. आमच्यात साडेचार तास भेट झाली हा भाजपच्या बावनकुळेंचा दावा भाजपच्या सुरेश धस यांनी स्पष्टपणे फेटाळला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
