Satish Bhosale Video : बीडमध्ये गरिबाला जबर मारहाण अन् आलिशान कारमध्ये नोटांची बंडलं फेकणारा निर्दयी सतीश भोसले आहे तरी कोण?

Satish Bhosale Video : बीडमध्ये गरिबाला जबर मारहाण अन् आलिशान कारमध्ये नोटांची बंडलं फेकणारा निर्दयी सतीश भोसले आहे तरी कोण?

| Updated on: Mar 07, 2025 | 2:58 PM

भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद सतीश भोसले याच्याकडे आहे. सतीश भोसलेवर काही प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. अलिकडच्या काळात भाजप आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याशी जवळीक असल्याचे समोर आले आहे.

गेल्या पाच वर्षापासून राज्याच्या राजकारणात सतीश भोसले हा सक्रिय आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीतील सतीश भोसले हा रहिवासी आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद सतीश भोसले याच्याकडे आहे. सतीश भोसलेवर काही प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. अलिकडच्या काळात भाजप आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याशी जवळीक असल्याचे समोर आले आहे. तर सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने परिसरात एकच दबदबा असल्याचे पाहायला मिळत आहे. याच सतीश भोसलेवर बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोक्या उर्फ सतीश भोसले याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यासाठी शिरूर पोलिसांचं पथक रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये सतीश भोसलेने त्याच्या काही साथीदारांसह एका व्यक्तीला जबर मारहाण केली आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मिडियावर पोस्ट करत हे काय आहे? असा सवाल करत गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे असे म्हटले आहे. तर मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? असा सवालही त्यांनी केला.

Published on: Mar 07, 2025 10:31 AM