‘वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब…,’ काय म्हणाले सुरेश धस
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा केल्याच्या घटनेनंतर राज्यभरात निषेधाचे मोर्चे निघत आहेत. आता शनिवारी देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत देखील मोर्चा सुरु झाला आहे. या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झालेले भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तिखट प्रतिक्रीया दिली आहे.
मुंबईत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण पद्धतीने हत्या केल्याच्या घटनेनंतर राज्यभरात निषेधाचे मोर्चे निघत आहेत. आता देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत देखील मोर्चा निघत आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशी मोर्च्याला परवानगी देण्यात आली आहे. या निषेध मोर्च्यात संतोष देशमुख यांचे कुटुंबिय सहभागी झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणारे बीडचे आमदार सुरेश धस देखील मुंबईतील या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड सह सर्व आरोपींना १४ दिवसांची एमसीआर मिळाला आहे. म्हणजे न्यायालयीन कोठडी मिलाळी असल्याचे सुरेश धस यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले. आपण या प्रकरणात फाशी मिळालीच पाहीजे यासाठी आग्रही आहोत. कारण अशा प्रकारची निर्घृण हत्या करणाऱ्यांना योग्य संदेश गेला पाहीजे. यापुढे कोणीच असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही अशी जरब समाजात बसली पाहीजे असे धस यांनी म्हटले आहे. आपण आता महादेव मुंडे, संदीप तिघोळे तसेच फड यांच्या झालेल्या हत्यांचे प्रकरण बाहेर काढत आहोत. त्यांचा उल्लेख करणे पाप आहे. यातील बहुतांश राजकीय मर्डर आहेत. मोर्च्यानंतर देशमुख कुटुंबिय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार का असे विचारता ते म्हणाले की आम्ही आधीच मुख्यमंत्र्यांना भेटून आलो आहेत. सरकारने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याचा अर्ज कोर्टात केला आहे. त्यावर धस यांनी संपत्ती जप्त करायलाच पाहीजे. कारण ही संपत्ती जी आहे ती फार लांब जाणार आहे. यातून पुढे धागे येतील दोरे येतील असाही टोला भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी लगावला आहे.
