सरकारला कुणाचं काही पडलेलं नाही, गोपीचंद पडळकर एकरकमी FRP वरुन आक्रमक

सरकारला कुणाचं काही पडलेलं नाही, गोपीचंद पडळकर एकरकमी FRP वरुन आक्रमक

| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 10:55 AM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उसाच्या एफआरपीच्या मुद्यावरुन विधानभवन परिसरात आंदोलन केलं आहे. गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटेनेचे सदाभाऊ खोत यांनी उसाची मोळी घेऊन आंदोलन केलं.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उसाच्या एफआरपीच्या मुद्यावरुन विधानभवन परिसरात आंदोलन केलं आहे. गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटेनेचे सदाभाऊ खोत यांनी उसाची मोळी घेऊन आंदोलन केलं. तर, गोपीचंद पडळकर यांनी यावेळी पवार कुटुंबावर आरोप केले. पवार कुटुंबानं 13 सहकारी साखर कारखाने विकत घेतल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तर, गोपीचंद पडळकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आक्रमक झाल्यानं साखर कारखाने खरेदी करणं थांबल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. तर, 400 कोटींचा कारखाना 10 कोटीला, 300 कोटीचा कारखाना 5 कोटीला घेतल्याचा आरोप पडळकर यांनी केला.